गणेशोत्सव निमित्ताने विविध ठिकाणी घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देण्याचा योग आला. प्रत्येक ठिकाणी गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले आणि सर्व मंडळांनी केलेली सुंदर सजावट, भक्तीभाव आणि उत्साह अनुभवला. गणेश भक्तांच्या सहभागामुळे वातावरण अधिकच मंगलमय झाले होते. 🙏






